सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
मुसळधार पावसाने कोकणात होत्याचे नव्हते केले तसेच कर्जंत शहरातही पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.यासाठी महाराष्ट्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जंत शनि मंदिराचे सभागृह साफसफाई केले.

यावेळी रसायनी येथील युवक काँग्रेसचे सहकारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक सचिव प्रशांत गायकवाड, कर्जत काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे , जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष दिपाली ताई म्हात्रे,जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सागर सुखदरे, रसायनी युवक उपाध्यक्ष सागर जोशी, रसायनी एनएसयुआयचे अध्यक्ष दिवेश पाटील, युवक काँग्रेसचे श्रीकांत खंदारे, ओमकार म्हात्रे, महिला काँग्रेस आशाराणी आईनकर , मनिषा पवार , प्रथमेश कांबळे, मयुर संगमिसकर, संदिप वाघे , रविंद्र पवार , रोशन वाघे , ज्ञानेश्वर खुंडे , राजेश मनवर , आझाद आलाम, शाहाबुद्दीन अन्सारी आदी उपस्थित होते.
तसेच कर्जत येथील पूरग्रस्त भागांमध्ये नागरीकाना अन्नधान्याचे कीट व पदाधिकारी महिलांकडून युवतींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.








Be First to Comment