सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
महाड येथील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून नागोठणे येथील रमाई नगर ग्रामस्थांच्या वतीने तांदूळ, डाळ, मसाले, हळद, साबण, मेणबत्ती, बिस्कीट, कांदा, बटाटा, माचीस, अगरबत्ती, मुलांचे कपडे, फिनेल, नाश्ताच्या वस्तू, दुध पावडर, पुरुषांचे कपडे, महिलांचे कपडे, बिसलेरी पाणी बॉक्स, आदींसह इतर उपयोगी वस्तू आणि औषधे असे सामान टेम्पो द्वारे बुधवारी महाडकडे रवाना करण्यात आला. पूरग्रस्तांना मदत करून नागोठणे येथील रामाईनगर ग्रामस्थांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
नागोठणे रामाईनगर भागातून मदतीचा सामान महाड कडे रवाना करताना जेष्ठ भीमसैनिक चंद्रकांत गायकवाड, विकास जाधव, दिलीप गायकवाड, पांडुरंग गायकवाड, केतन गायकवाड, मयूर गायकवाड, तुषार जाधव, सचिन गायकवाड, अमित रणदिवे, सागर राणे, शहाबुद्दीन आत्तार, अशोक घोम्बाळे, लखन प्रसाद, शाहिद अत्तार, सिद्धेश गायकवाड, मनिष गायकवाड, राकेश गायकवाड, सुमित शिंदे, नितीन गायकवाड, रुपेश गायकवाड, हेमंत जाधव, कुणाल गायकवाड, सतीश राणे, जी. पी. पाटील, किरण गायकवाड, सुयोग गायकवाड, प्रणय गायकवाड, मनोज गायकवाड, नंदाताई गायकवाड, माधुरी जाधव, गायकवाड, तेजस्विनी गायकवाड, पूनम गायकवाड, तुळसीबाई गायकवाड, रेश्मा गायकवाड आदी उपस्थित होते.








Be First to Comment