सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
महाड येथील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे शहर महिला आघाडी व शांतीनगर महिला मंडळ यांच्या वतीने तांदूळ, गहू, फरसाण, बिसलेरी पाणी, बिस्कीट, नॅपकिन, मास्क तसेच महिलांना उपयुक्त असे कपडे आदी सामान टेम्पो द्वारे बुधवारी महाडकडे रवाना करण्यात आला. पूरग्रस्तांना मदत करून राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे शहर महिला आघाडी व शांतीनगर महिला मंडळ यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
नागोठणे शांतीनगर भागातून मदतीचा सामान महाड कडे रवाना करताना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहर अध्यक्षा सुजाता जवके, जिल्हा सरचिटणीस आशा शिर्के, शहर उपाध्यक्षा प्रतिभा तेरडे, स्नेहल काळे, ऐश्वर्या शहासने, प्रणिता शहासने ,सविता शहासने , श्रद्धा शेडगे ,सुनीता तटकरे, सुनीता दास, संध्या जाधव आदी महिला वर्गासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सदस्य सुधाकर जवके, नितीन पत्की, सिद्धेश काळे आदी उपस्थित होते.








Be First to Comment