सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
पूरग्रस्तांना प्रामुख्याने ज्याची आवश्यकता लागत आहे. अशा प्रकारचे सामान उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रत्नागिरी चिपळूण याठिकाणी रवाना करण्यात आले.
पूरग्रस्त भागातील ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांना आता सध्या तातडीने नवीन कपडे, भांडे आणि घरगुती वस्तू देण्याची गरज आहे. जेणेकरुन त्यांचे संसार उभे राहण्यास मदत होईल असे आवाहन राष्ट्रवादीचे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केले होते.
त्यानुसार पूरग्रस्तांना मदतीचा हातभार देणारे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदेशानुसार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, रायगड जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे, जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे या पूरग्रस्त भागात स्वतः पाण्यात उतरुन लोकांना धीर देण्याचे काम करत आहेत. तर लोकांना गरजेच्या लागणाऱ्या वस्तूंची सोय करत आहेत.त्यामुळे आपणही मदत करण्यास सुरुवात केली असल्याचे प्रशांत पाटील यांनी सांगितले.
आज त्यांनी उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुरुष, महिला व लहान मुलांना कपडेलत्ते आदींनी भरलेली गाडी चिपळूणकडे रवाना केली आहे. पूरग्रस्तांवर आलेली भयानक व्यवस्था पाहून प्रत्येकाने एक हात मदतीचा माणुसकीचा समजून आपापल्या परीने मदत करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी यावेळी केले.यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment