सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील ग्रुप ग्रामपंचायत वडगाव व लायन्स क्लब ऑफ गोल्ड वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने बॉटल फॉर चेंज या उपक्रमातर्गत लोकांनी वापरलेले प्लास्टिक स्वच्छ करून वेगळे जमा करावे व फेकून न देता रिसायकलीनला द्यावे असा संदेश या कार्यक्रमातून नागरिकांना देण्यात आला .
ग्रुप ग्रामपंचायत वडगाव हद्दीमध्ये घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत प्लास्टिकचा पुनर्वापर करणे यासाठी लायन्स क्लब ऑफ गोल्ड वाशी आणि बिसलेरी क्मनीच्या श्रेया सुधीर व ग्रामपंचायतीच्यावतीने मार्गदर्शनपर शिबिर ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आले . गावातील वापरलेले प्लास्टिक ग्रामपंचायत एकत्र करणार व ते बिसलेरी पाणी घेवून जाणार त्यापासून उपयुक्त वस्तू बनविण्यासाठी त्याचा वापर होणार , त्यामुळे ग्रामपंचायतही स्वच्छ होणार.प्लास्टिकमुक्त होईल व प्लास्टिक नष्ट होत नसल्याने त्यामुळे होणारे अनेक दुष्परिणाम व प्रदूषण होणार नाही यासाठी ग्रुप ग्रामपंचायत वडगांवने पुढाकार घेतला असून त्यासाठी लायन्स क्लब ऑफ गोल्ड वाशी व बिसलेरी कंपनी यांनी सदरील उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

सदरील कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी महादेव गडगे , उपसरपच सुजाता विश्वनाथ पाटील , ग्रामविकास अधिकारी रश्मी रविद्र शिदे , ग्रामपचायत सदस्य महादेव गडगे ,नंदकुमार पाटील , हरेश पाटील ,राजेश पाटील , कल्पना ठोबरे , सरिता गडगे ,वर्षा पाटील , आशासेविका , अंगणवाडीसेविका , ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग हजर होते .
त्याचप्रमाणे लायन्स क्लब ऑफ गोल्ड वाशीचे अध्यक्ष अनुराधा जैन,उमा अहुजा ,आशा पटेल , सुधाराणी जैन , राजेंद्र महानुभाव आणि बिसलेरी कपनीच्या श्रेया सुधीर व त्याचे सहकारी कार्यक्रमासाठी हजर होते .








Be First to Comment