रसायनी पोलिस स्टेशन व एमआयडीसी पाताळगंगा इंडस्ट्रीजचेही सहकार्य
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील अनेक गावांत पुराचा तडाखा बसल्याने जनजीवन विस्कळित झाले. महाड शहर व महाड तालुक्यात आलेल्या पुरामुळे तेथील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले.या पूरग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी आपले नैतिक कर्तव्य समजून मदत करण्यासाठी मोहोपाडा व नवीन पोसरी व्यापारी असोसिएशन धावले. रसायनी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकसहभागातून व्यापारी असोसिएशन मोहोपाडा-नवीन पोसरी व एमआयडीसी पाताळगंगा इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपशेठ पाटील ,सेक्रेटरी अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने महाड पूरग्रस्त भागात जाऊन लोकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या.

यावेळी पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना महिलांच्या भावना अनावर झाल्या आणि अश्रुंवाटे त्यांनी आपले दुःख व्यक्त करीत मोहोपाडा नवीन पोसरी व्यापारी असोसिएशन, रसायनी पोलिस स्टेशन व एम आयडीसी पाताळगंगा इंडस्ट्रीज यांचे आभार मानले. यावेळी व्यापारी असोसिएशनने महाड तालुक्यातील ढालवाडी,समर्थंनगर, खरवईं,आटला,आसनपोईं,हनुमाननगर नागालवाडी फाटा या परिसरातील नागरिकांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यात महिलांना साडी 200 नग, महिलांना गाऊन 200 नग,लहान मुलांना कपडे (वय 5ते 10)-100 नग, तर (10 ते 15) वयोगटातील मुलांना कपडे-100 नग,बरमुडा-200 नग,टि शर्टं -200 नग,ब्लॅकेंट-200नग,चट ई-200 नग,साबण-200 नग,मास्क-200 नग, सॅनिटरी पॅड-200 नग,खजूर बाॅक्स 500 ग्रम-500 नग, शेंगदाणा चिक्की 250 ग्रम-500 नग, पिण्याचे बिसलरी पाणी-1200 लिटर, मेणबत्ती -1200 नग, काडेपेटी-200नग,केली -100 डझन, बिस्कीट -3000 पॅकेट आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.मोहोपाडा नविन पोसरी व्यापारी असोसिएशनच्या कार्यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी कौतुक केले.








Be First to Comment