सिटी बेल | माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान मधील जेष्ठ नागरिक दशरथ चव्हाण यांनी जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी आणि संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे. त्यांना यावेळी शिव बंधन बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे, वन समिती अध्यक्ष योगेश शेठ जाधव, चर्मकार समाजाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत कारंडे, सागर पाटील, अनंत शेलार,गणेश कदम, सिताराम शिंदे, विजय सावंत, दत्ता सनगरे, विकास पार्टे यासंह अन्य उपस्थित होते.
आपल्या जीवनातील अनेक चढउतार अगदी जवळून पाहिलेले आहेत तर कित्येक निवडणुकीत एखाद्या पक्षाच्या पारड्यात आपले बहुमूल्य मत देऊन आपल्या वार्डातील उमेदवाराला निवडून विजयी केलेलं आहे. परंतु निवडून आल्यावर जेष्ठांच्या तोंडाला पाने पुसली असल्याने आता त्यांच्यावर आता विश्वास नसल्याने गावात कार्यरत असलेला अन सर्वसामान्य लोकांना वेळप्रसंगी मदतीचा हात पुढे करणारा एकमेव पक्ष म्हणून शिवसेना हाच असल्याने ह्या पक्षाने आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात जी काही उल्लेखनीय कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि बहुतांश कामे उत्तम प्रकारे मार्गी लावली आहेत हे लक्षात घेऊन आता येथील जेष्ठ नागरिकांनी स्वेच्छेने शिवसेनेचे शिव बंधन बांधण्यास सुरुवात केली आहे.

तर महिला वर्गाने सुध्दा प्रत्येक वार्ड पिंजून काढले आहेत शिवसेनेच्या महिला आघाडी संघटक संगीता जांभळे यांच्या कामाची पद्धत पाहून पद्मा सकपाळ यांनी सुध्दा आज स्वखुशीने शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला आघाडीच्या शहर संघटक संगीता जांभळे, उप शहर संघटक समिना महापुळे, संपर्क संघटक प्रीती कळंबे, शलाका शेलार, श्रुतिका दाभेकर, अनिता मोरे, ऐश्वर्या शिंदे, संजना शेलार, रचना सावंत, योगिता चौगुले, अंकिता मोरे, रिझवाना शेख, हेमा सुरेश कदम, निकिता कदम,जुलेखा पटेल, दीपा परब, सुजाता शिंदे, निशा पार्टे, सविता शिंदे, कल्याणी शिंदे, जयश्री कदम, सविता कारंडे, सुहासिनी शिंदे आदी महिला मोठया प्रमाणावर उपस्थित होत्या.
या सर्व नवोदित पक्ष प्रवेश करणाऱ्याचे शिवसेनेच्या आपल्या हक्काच्या कुटुंबात नेते मंडळींसह सर्व शिवसैनिकांनी सहर्ष स्वागत केले असून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.








Be First to Comment