Press "Enter" to skip to content

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने 10 नव्या शिवसेना शाखा

खारेपाटात शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी शिवसैनिक सज्ज : राजा केणी

सिटी बेल | अलिबाग | याकुब सय्यद |

अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाट विभागात शिवसेनेची घौडदौड सुरुच ठेवली आहे. या विभागात शिवसेनेच्या 10 शाखा सुरु करण्यात आल्या असून यातून पक्षवाढीला अधिक गती मिळणार आहे. शिवसेनेची खारेपाट विभागात सुरु असलेल्या घौडदौडीने शेतकरी कामगार पक्षाच्या नेतेमंडळींमध्ये चांगळीच खळबळ माजली आहे.

80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार अलिबाग तालुक्यात राजा केणी यांनी आपले सामाजिक कार्य सुरु ठेवले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात 350 आदिवासी बांधवांना खावटी वाटप करण्यात आले.

यामुळे आदिवासी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे सामाजिक कार्य सतत चालू राहणार असे राजा केणी यांनी सांगितले. त्याचबरोबर वाढदिवसानिमित्ताने खारेपाट विभागात नव्या शाखा सुरु करण्यात आल्या आहेत. गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक या धोरणानुसार जिल्हा परिषदेच्या कुर्डुस मतदार संघात शिवसेनेची मजबुत पक्षबांधणी सुरु आहे. पेझारी, आंबेपुर, बांधण, ताडवागळे, कोळघर, दळी- मरोशी, मेढेखार, आनंदवाडी-कुर्डुस या ठिकाणी नव्याने शिवसेनेच्या शाखा सुरु करण्यात आल्या आहेत.

गोरगरीबांच्या अडीअडचणीला धावून जाणारा पक्ष म्हणून शिवसेनेची प्रतिमा सर्वसामान्य नागरिकांच्या मनात ठासून भरली जात आहे. यास येथील नागरिकांचा शिवसेनेला पुर्णपणे सहकार्य मिळत असून शेतकरी कामगार पक्षाच्या नेतेमंडळींच्या दादागिरीला न जुमानता हे नागरिक शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकवटत आहेत. यामुळे शेकापच्या नेतेमंडळींच्या मनात धडकी भरली असल्याचे दिसून येत आहे.

या कार्यक्रमाला शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी शिवसेना उप तालुका प्रमुख प्रकाश पाटील शिवसेना पोयनाड विभाघ प्रमुख योगेश जुईकर कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघांचे संपर्क प्रमुख शैलेश पाटील विभाग संघटक महेंद्र गोटया पाटील उप संघटक विकास निलकर उप विभाग प्रमुख महेश वावेकर उप विभाग प्रमुख अरविंद पाटील युवा सेनेचे कुर्डूस विभाग प्रमुख अभिषेक पाटील संकेत पाटील भुषण पाटील नवीन शिर्के ग्रामपंचायत सदस्य उत्तम शेठ पाटील प्रमोद पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.