सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
21 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे दहीवली प्रभागातील संजय नगर व शिवाजी नगर मध्ये अनेक घर पाण्याखाली गेली होती. प्रचंड नुकसान येथील नागरिकांचे झाले आहे.
या प्रभागातील नागरिक आणि कर्जत नगरपरिषदेचे स्विकृत नगरसेवक संकेत भासे यांनी आपलं कर्तव्य म्हणून या परिसरातील लोकांना मदत करणे गरजेचे आहे या भावनेतून आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन तसेच गुंज फाउंडेशन, AAK ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्य वास्तूचे वाटप करण्यात आले.
या वेळी कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेवक विवेक दांडेकर, नगरसेविका संचीता पाटील, नगरसेवक संकेत भासे, युवासेना अधिकारी सुदेश देवघरे, अवजड वाहतूक तालुका प्रमुख दिनेश कडू, विजय जिंनगरे, मनीषा भासे, प्रकाश पालकर, शाखा प्रमुख विनायक गायकवाड, चेतन देशमुख, विशाल राठोड सह नागरिक उपस्थित होते.








Be First to Comment