सिटी बेल | प्रतिनिधी | सारडे |
“देहे त्यागीता कीर्ती मागे उरावी , मना सज्जना हेच क्रिया धरावी , मना चंदनाचे परित्वा झिझावे, परी अंतरी सज्जना निववावे”या समर्थ रामदास स्वामी च्या बोधवाचनाप्रमाणे सारडे गावातील अनमोल संगीत रत्न, जेष्ठ पखवाज वादक, मृदुन्गमणी, संगीताचा एक सच्चा उपासक ,संगीतकलेतील जादूगार आपलं संपूर्ण जीवन हे संगीतासाठी वेचणारे संगीत क्षेत्रात आपल्या नावाचा कमालीचा ठसा उमटवून संगीत कलेचे बीजारोपण हे आपल्या शिष्यगण यांना देऊन नवतरुणा मध्ये ताल क्षेत्राचे बीज रोवनारे सारडे गावातील उतुंग व्यक्तिमत्त्व राजारामबुवा सारडेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर सारडे येथील हआपल्या माय भूमीतील स्मशानभूमीत अत्यं संस्कार करण्यात आले. प्रासादिक भजनातील सारडेकर बुवा याच नावाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित होते. पखवाज क्षेत्रात आपले नाव सातासमुद्रापार नेण्याच अनमोल कार्य केले. त्यांच्या अंतिमयात्रेत संगीतक्षेत्रातील दिगग्ज संगीतकार व आपले शिष्यगंन हे उपस्थित होते. संगीताच्या या संगीतरत्नांचे अंतिमशोक यात्रा ही संगीताच्या तालातच स्मशानभूमीत नेण्यात आली.
संगीतक्षेत्रातील दिग्गज पंडित महादेवबुवा शहाबाजकर , शंकूनाथ बुवा पडघेकर , मृदुन्ग मणी प्रतापजी पाटील अरुणबुवा कारेकर अश्यानि आपल्या भावना विशद केल्या. राजाराम बुवा सारडेकर यांनी खरी आमच्या आयुष्याला खर व्यासपीठ दिलं विविध संगीत कार्यक्रमात साथ संगत केली त्यांच्या अश्या या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. पाटील कुटुंबातील आम्ही सुद्धा एक सदस्य आहोत बुवांच्या जाण्याने त्याच्या कुटूंबियांना दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देवो त्यांच्या पाश्चात पत्नी तीन मुले , मुली सुना नातू असा परिवार आहे जगातील एकमेव अस उदाहरण असेल की आपल्या आडनावाने नाही तर गावाच्या नावाने ओळखत होते.








Be First to Comment