सिटी बेल | रोहा | अमूलकुमार जैन |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुक्यातील न्हावे येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना सार्थ प्रतिष्टान यांच्यामार्फत शिवसेना शाखा न्हावे यांच्या कडून शाळेय वस्तूचे वाटप करण्यात आले.
कोरोना चे संकट अजूनही भोंगावात आहे.शाळा अजून ही बंद आहेत. शालेय शिक्षण मात्र विविध माध्यमातून सुरू आहे. तळागाळातील अनेक गरजू विद्यार्थ्यास कोरोनाच्या भीषण संकटात शालेय वस्तू मिळणे मुश्किल झाले आहे. ह्या सर्वच बाबी विचारात घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करत एक सामजिक उपक्रम राबविण्यात आला.
ह्या प्रसंगी मनोज भायतांडेल उपसरपंच न्हावे , बिपिन झुरे , जयेश पाटील , पांडुरंग न्हावकर , यशवंत झुरे , सुजाता झुरे , शिक्षिका मनिषा पाबरेकर अन्य मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment