सिटी बेल | रायगड | अमूलकुमार जैन |
मुरूड तालुक्यातील काशीद येथे मुसळधार पावसामुळे काशीद पूल दुर्घटनेमध्ये मृत्यू मुखी पडलेले विजय चव्हाण यांच्या कुटुंबियांना भाजपच्या पाठपुराव्याने चार लाखाची मदत प्राप्त झाली आहे.त्याबाबतचे पत्र दक्षिण जिल्हाध्यक्ष महेश मोहिते,तहसिलदार गमन गावित यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे.
11 जुलै2021 रोजी मुरूड तालुक्यातील मुरूड अलिबाग मार्गावरील मौजे काशीद येथील सुमारे पन्नास वर्षापूर्वीचा पूल हा वाहून गेला होता.या दुर्घटनेत मुरूड तालुक्यातील एकदरा येथील विजय चव्हाण हे अलिबाग कडून मुरुडकडे येत असताना त्यांची मोटरसायकल या दुर्घटनेत सापडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.
मयत विजय चव्हाण यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हाप्रमुख ऍड.महेश मोहिते यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याने चार लाख रुपयांची आर्थिक मदत प्राप्त झाली आहे.
सदर मदतीचे पत्र मयत विजय चव्हाण यांची पत्नी विजया चव्हाण यांच्या खात्यावर ही रक्कम आज जमा करण्यात आली आहे.असे पत्र भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हाप्रमुख ऍड.महेश मोहिते, मुरूड तहसीलदार गमन गावित यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रवीण बैकर,महेश मानकर ,तांबटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment