Press "Enter" to skip to content

रोह्यातील साईकृपा गँरेजचे पुरग्रस्तांसाठी आगळेवेगळे योगदान

मदत जरा हटके.‌‌.. महाड पुरग्रस्तांच्या सुमारे शंभर दुचाकींची केली मोफत दुरूस्ती

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोह्यातील साईकृपा आँटो गँरेज रोठ खु.यांच्या वतीने महाड पुरग्रस्तांच्या सुमारे शंभर दुचाकींची मोफत दुरुस्ती करून पुरग्रस्तांसाठी एक आगळेवेगळे योगदान देण्याची कामगिरी त्यांनी बजावली आहे.

२५ जुलै २०२१ रोजी महाड येथील छत्रपती शिवाजी चौकात जाऊन सकाळ पासून ते रात्री उशिरापर्यंत साईक्रुपा गँरेजचे प्रमुख भरत मालुसरे, जगदिश तुपकर व ओमकार खंडागळे तसेच त्यांचे सहकारी मित्र योगेश मोरे, ओमकार पिंपळे,संदेश मांदाडकर,मयुरेश तुपकर, लोचन तुपकर, राम सावंत,समीर ठमके,अनिरूद्ध चौलकर, गौतम सावंत, अंटू शाव,सिद्धेश पवार,रघुवीर कडव, दिनेश आर्ट आदींनी सामुहिकरित्या एकत्र येऊन व सामुहिक योगदान देऊन शंभर दुचाकी वाहनांची मोफत दुरूस्ती केली आहे. या कामासाठी त्यांनी रोह्यातून जाताना ऐंशी लि.आँईल,ग्रीस व अन्य साहित्य सोबत नेले होते.तर दुपारी व रात्रीचे जेवणही त्यांनी सोबत घेऊन संपूर्ण सेवाही मोफत दिली.

याबाबत माहिती देताना पुरग्रस्तांच्या बाईक मोफत दुरूस्ती करण्याची संकल्पना भरत मालुसरे व जगदीश तुपकर यांच्या काही मित्रांनी मांडल्यानंतर संकल्प पुर्ण करण्याच्या इराद्याने त्यांनी आपली योजना बनविली व २५ जुलै रोजी त्यांनी रात्री उशिरापर्यंत आपली कामगिरी फत्ते करून दाखविली. याबाबतचे अवाहन दोन दिवस अगोदरच सोशल मिडियाच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

साईकृपा आँटो गँरेजच्या या आगळ्या वेगळ्या कामगिरीची दखल घेऊन रा.जि.पालकमंत्री आदिती तटकरे, स्थानिक आ.भरत गोगावले, आ.अनिकेत तटकरे यांनी प्रत्यक्षात शिवाजी चौकात भेट देऊन साईकृपा आँटो गँरेजच्या सर्व टिमच्या या योगदानाबद्दल कौतूक करून समाधान व्यक्त केले. तर महाड तालुका सर्व शासकीय यंत्रणा तसेच पोलिस यंत्रणा यांचेही याकामी मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगण्यात आले आहे. महाड येथील यशस्वी कामगिरीनंतर शुक्र. दि.३० जुलै रोजी अशाचप्रकारचे मोफत दुचाकी दुरूस्ती करण्याचे आपला मनोदय असल्याचे याबाबत माहिती देताना भरत मालुसरे यांनी सांगितले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.