पाच टना पेक्षा अधिक कचरा गोळा
सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या महाडकरांना सावरण्यासाठी वेळ लागणार असून सर्व प्रकारच्या मदतीसह खालापूर नगर पंचायतीने वेगळा निर्णय घेत महापूरात चिखलमय झालेले महाड स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे.

नगरपंचायत खालापूर चे पंधरा सफाई कामगार, एक घंटा गाडी इलेक्ट्रिशन ,नगर रचनाकार अधिकारी मोरखंडीकर, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग मगर हे सर्वजण मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी महाडमध्ये दाखल झाले आहेत. प्रशासनाने नेमून दिलेला महाड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक खालापुरातील स्वच्छतादूत सफाई करत आहेत.

पुरामुळे उध्वस्त झालेले संसार घरातील मालमत्तेचे झालेले नुकसान जागोजागी दिसत असून सर्व स्वप्नांचा झालेला चिखल गोळा करताना स्वच्छता दूत देखील हळ हळत आहेत. घरातील लहान मुलांच्या खेळण्या पासून गादी, भांडीकुंडी संसार पुराने चिखलमय करून टाकला आहे. खालापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता दूताने सफाई करताना रविवार पर्यंत जवळपास पाच डंपर कचरा गोळा केला असून अव्याहतपणे काम देखील सुरू होते. स्वच्छता दूत घेत असलेला मेहनतीत सर्वत्र कौतुक होत असून अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहेत.









Be First to Comment