Press "Enter" to skip to content

महादेव दीपाजी जाधव यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील श्री. क्षेत्र तळवली येथे स्थाईक असलेले महादेव दीपाजी जाधव यांचे वयाच्या ८५ वर्षी व्रुद्धपकाळाने दु:खद निधन झाले.

महादेव जाधव यांचे मुळ गाव गोवे.परंतू गेल्या काही वर्षांपासून तळवली येथे घरजावई म्हणून आल्याने ते कायमचे रहिवासी झाले.ते क्रुषीखात्यामध्ये नर्सरी विभागात सर्व्हिस करून सन्मानाने निव्रुत्तही झाले. आपल्या निव्रुत्तीनंतर त्यांनी आपला पिढ्यानपिढ्यांचा शेती हा व्यवसाय सांभाळला.त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत्त समजतात त्यांचे आप्तस्वकीय, मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेप देऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.तर कोरोना नियमावलीचे पालन करून त्यांचे अंत्यविधी पार पाडण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलं,दोन मुली,सुना,जावई,नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी रवि.दि.१ आँगस्ट तर अंतिम धार्मिकविधी ३ आँगस्ट रोजी तळवली येथील राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.