सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रायगडमध्ये मुसळधार पावसाने अक्षरक्ष: हाहाकार माजविला आहे.संपुर्ण रायगड जिल्ह्यातील नागरिकांना त्याचा थोडाफार फटकक बसला आहे.तर महाडमध्ये या मुसळधार पावसाने फारच मोठी भयावह स्थिती निर्माण केली.त्या अनुषंगाने विविध ठिकाणांहून हजारो मदतीचे हात पुढे आले. तर आपलाही या संकटकाळात खारीचा वाटा असावा या उद्देशाने रोहे-धाटाव औद्योगिक वसाहतीतील एक्सेल कंपनीच्या वतीने १००पाणी बॉटल बाँक्स, व ५० मोठे बिस्किटांचे बॉक्स असे एकूण दोन टेम्पो पाठवण्यात येऊन तातडीची मदत करण्यात आली आहे.

एक्सेल इंडस्ट्रीज रोहा व विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट रोहा यांच्या मार्फत पूरगस्त भागात तातडीने मदत करण्यात आली. सातत्याने सामाजिक बांधिलकी उपक्रमात पुढाकार घेऊन ग्रामीण विकासाची कामे करणारी ही कंपनी आहे. रोहा पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
रोहा पोलीस निरीक्षक बंडगर साहेब, एक्सेल कंपनीचे सि. वाईस प्रेसिडेंट आदित्य निगम, एच आर हेड हाशीराम मंचेकर,पी.आर. ओ. नितीन जोशी आणि सि. एस.आर .हेड सुशिल चं. रुळेकर यांच्या उपस्थितीत या सहायता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.








Be First to Comment