Press "Enter" to skip to content

रोठ खु.येथे जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील रोठ खु.येथील रहिवासी तथा ग्रा. पं.सदस्य व आय काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य पर्यावरण सचिव तसेच तालुका आगरी समाजाचे खजिनदार सचिन मोरे यांनी आपल्या संकल्पनेतून व सामाजिक बांधिलकी जपत गावाच्या विकासासाठी मोलाचे योगदान देणा-या गावातील जेष्ठ नागरिक पुरुष व महिला यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे.

गुरूपौर्णिमा या पर्वणीचे औचित्य साधून भवानी माता मंदिरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी गावातील सर्वश्री लिलाधर मोरे,हरिश्चंद्र मोरे,प्रकाश डाके,महेंद्र कांबळे,किशोर मोरे,देवराम कर्णेकर,लक्ष्मण मोरे,बापू जोशी,हिराजी डाके,मारूती डाके,विश्वास बोरेकर,दत्ता मोरे,गोपाळ जोशी,मारुती मोरे,उमाजी मोरे,सुनीता मोरे,सुनीता डाके,अनुसया बोरेकर,शशिला मोरे,लिलाबाई मोरे,निर्मला कर्णेकर,इंदू कर्णेकर,नीता मोरे,कविता मोरे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

तर या कार्यक्रमात रोठ खु.गावातील प्रत्येक सुख-दु:खाच्या प्रसंगी तसेच गावातील मंदिरातील उत्सव व अन्य सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन मोलाचे योगदान देणारे जेष्ठ पुरुष तसेच जेष्ठ महिला यांचा यावेळी विशेष असा सन्मान करण्यात आला.सामाजिक बांधिलकी जपत सचिन मोरे यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.