रसायनीकर पूरग्रस्तांच्या मदतीला धावले
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
महाडमधील पूरग्रस्त व दरडग्रस्त भागातील नागरिकांना अनेक ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू झाला असून माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पाताळगंगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने महाड तालुक्यातील पुरग्रस्तबाधित भागाला जाऊन जिवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.

मुसळधार पावसाने तयार झालेल्या महापुराच्या स्थितीत अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत,तर लाखो लोक बेघर झाले आहेत.संकटग्रस्ताला मदतीचा हात द्यावा या भावनेतून माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे यांनी रसायनी पाताळगंगा परिसरातील कार्यकर्त्यांसह महाड तालुक्यातील पुरग्रस्त वडवली बौध्दवाडी, अरविंद नगर शिरगाव, आकले व भोर या पुरग्रस्त भागात जाऊन जिवनावश्यक वस्तूंचा मोठा साठा वाटप केला.

यात पुरग्रस्तांना तांदूळ,डाली,पीठ,मसाले, चहापावडर,साखर, बिस्किटे,साबण,टुथपेस्ट, मेणबत्ती,बेसिक औषधे,बेडसिट,ब्लॅकेंट,तेलाचे पॅकेट,फिनाॅल बाॅटल,पाणी बाॅटल,कपड्यांचा व अंगाच्या साबण,खोबरेलतेल ,माचिस आदी जिवनावश्यक साहित्य पुरग्रस्तठिकाणी जावून वाटप करुन माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे यांनी पूरग्रस्त भागातील कुटूंबियांना धीर देवून त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला.








Be First to Comment