सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा “प्रेरणा दिवस वृक्षारोपण पंधरवडा” हा उपक्रम शिक्षकसेनेचे प्रांताध्यक्ष तथा अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) ज .मो. अभ्यंकर यांच्या नियोजन व रायगड जिल्ह्यात माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक १६ जुलै ते ३१ जुलै दरम्यान संपुर्ण राज्यात साजरा करण्यात येत आहे.

त्याच अनुषंगाने शिक्षक सेना उरण- रायगडच्यातर्फे पुनाडेवाडी येथे शेकडो झाडांचे वृक्षारोपण,शाळेतील विद्यार्थ्यांना मास व वह्या तसेच ६० कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी नितिन चौधरी राज्य समन्वक शिक्षक सेना,विशाल बावा कनिष्ठ महाविद्यालय अध्यक्ष शिक्षकसेना, जगदीश भगत कार्याध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकसेना ,मनीष पाटील कनिष्ठ महाविद्यालय मुंबई विभाग अध्यक्ष शिक्षक सेना, विजय भोईर जि.प.सदस्य, दिपक ठाकूर प.स.सदस्य, कौशिक ठाकूर कार्याध्यक्ष कोकण विभाग शिक्षक सेना,रोशन तांडेल शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष,हितेंद्र म्हात्रे शिक्षक सेना जिल्हा सरचिटणीस,सुरेश गावंड सामाजिक कार्यकर्ते, लक्ष्मण पाटील शिक्षक सेना अध्यक्ष पेण, निराताई पाटील सरपंच आवरे,प्रणिता म्हात्रे सरपंच गोवठणे,सुनील ठाकूर शाखाप्रमुख आवरे,अमित म्हात्रे युवाधिकारी आवरे,प्रशांत म्हात्रे शाखाप्रमुख पाले,शाम गावंड उपशाखाप्रमुख,अनिल पाटील,कृष्णा पाटील,सोहम भोईर,कार्यक्रमास प्रमुख मान्यवर उपस्थित उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सेना उरण तालुका अध्यक्ष यशवंत पाटील,उपाध्यक्ष अनंत पाटील,संजय होळकर, खजिनदार दिलीप म्हात्रे, सल्लागार महेश गावंड ,वासुदेव म्हात्रे,सर्व पदाधिकारी व सदस्य शिक्षक सेना यांनी मेहनत घेतली.








Be First to Comment