पनवेल मधील म ए सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील माध्यमिक विभाग मराठी माध्यमात दि. २३ जुलै रोजी गुरूपौर्णिमेनिमित्त विद्यार्थी व पालकांसाठी ऑनलाईन पद्धतीने बालकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे येथील बालकीर्तनकार शृंगेरी देशपांडे हीने कीर्तनातून गुरू शिष्य परंपरा उलगडून दाखविली.
महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुश्राव्य गुरूवंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली.
शृंगेरी हीने अभंग गायन, कविता, कथाकथन या प्रभावी सादरीकरणातून विद्यार्थ्यांना दिनमहात्म्य समजावून सांगितले.
याप्रसंगी बोलताना विद्यालयाच्या पर्यवेक्षिका मा समिता सोमण यांनी बोधपर गोष्टीतून जीवनातील गुरूंचे स्थान अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती धोपाटे यांनी केले.
गुरूपौर्णिमे निमित्त विद्यालयात चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

फडके विद्यालयात बालकीर्तनातून रंगला गुरूवंदना कार्यक्रम
More from रायगडMore posts in रायगड »






Be First to Comment