सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
जासई परिसरातील भाजपचे उमदे नेतृत्व समजले जाणारे जासई विभागीय भाजप अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे हे आज २५ जुलै रोजी वयाच्या ४५ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.
जासई विभागीय भाजप अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे यांनी यापूर्वी जासई उपसरपंच म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे कार्य महान असे समजले जात कारण त्यांनी अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळवून दिला तसेच शिक्षणापासून वंचीत असलेल्या गोरगरीब विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देण्याचे कार्य केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांचे विश्वासु सहकारी म्हणून समजले जात होते. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्यासाठी उभारलेल्या आंदोलनात हिरिरीने सहभाग घेतला होता. गेले काही दिवस त्यांच्यावर मुबंई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतु त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्यांच्यावर काळाने झडप काळाच्या पडद्याआड नेले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आज त्यांच्यावर जासई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. जासई परिसरातील सर्वसामान्यांचे उमदे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. मेघनाथ म्हात्रे यांच्या निधनाबद्दल सर्वपक्षीय नेतेमंडळी, सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व जासई ग्रामस्थांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.








Be First to Comment