Press "Enter" to skip to content

खालापूर तालुक्यातून पुरग्रस्तांसाठी महाडकडे मदतीचा ओघ सुरू

प्रशासन, सेवा भावी संस्था मदतीसाठी सरसावल्या

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

दरडग्रस्त आणि पूरग्रस्त महाड तालुक्यातील कुटुंबासाठी सर्व ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू झाला असून खालापूर तालुक्यातून देखील प्रचंड प्रमाणात मदत महाड कडे रवाना होत आहे. अतिवृष्टी महापूर आणि त्यात दरडीचा कहर यामुळे कोलमडलेला महाड तालुका सावरण्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत.

खालापूर तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, समाजसेवी संस्था, महसूल प्रशासन, खालापूर नगर पंचायत, पोलीस विभाग सर्वतोपरी मदत पाठवित आहेत.

जीवनाश्यक वस्तू सह प्रत्येक गरजेची वस्तू महाडकडे पाठवण्यात येत आहे .खालापूर नगरपंचायतीने मुख्याधिकारी सुरेखा भनगे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कामगारांचे पथक घंटागाडी सह महाडकडे पाठवले असून दोन इलेक्ट्रिशन देखील त्यात समावेश आहे.

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी खालापूर यांचे मदत वाटप देखील महाडमध्ये सुरू झाले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समिती, खालापूर तालुका यांचे 33 स्वयंसेवक
जीवनावश्यक वस्तूचा साठा घेवून महाड येथे रविवारी रवाना झाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.