Press "Enter" to skip to content

पेण मुस्लिम समाजाच्या वतीने महाडच्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर या तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन अनेक कुटुंबांची हानी होऊन नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी दरड कोसळून अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत.

महाड मधील मुस्लिम कुटुंबीयांच्या घरात पाणी शिरून लाखोंचे नुकसान झाले असल्याने या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी शासनाने केलेल्या आवाहना नुसार पेण मधील मुस्लिम समाजाने एक हात मदतीचा पुढे केला आहे. जवळपास 250 ते 300 कुटुंबीयांना एक महिन्याचा तांदूळ, डाळदाणा, गोडेतेल, पाण्याचा बाटल्या यासह अन्य वस्तूंच्या गाड्या भरून महाडकडे रवाना करण्यात आल्या आहेत.

यामध्ये पेण शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक हबिब खोत, रफिक झटाम, इम्रान खान, ताझीम मुकादम, शब्बीर खान, खालिद खोत, सलमान किरकिरे आदिंनी महाड येथे जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.

यावेळी बोलताना हबिब खोत यांनी सांगितले की, अशा कठीण प्रसंगी नैसर्गिक आपत्तीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना सामाजाच्या वतीने मदतीचा एक हात म्हणून पुढे केला असून अधिकाधिक मदत देण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.