Press "Enter" to skip to content

मोहोपाडा आणि नविन पोसरी येथे आदीवासी बांधवांना खावटी वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

वासांबे मोहोपाडा परिसरातील शिवनगरवाडी, शिदींवाडी,मोहोपाडावाडी,खोंडावाडी आदी भागातील 145 आदीवासी बांधवांना एकात्मिक विकास प्रकल्प पेण यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे खावटी वाटप कार्यक्रम मोहोपाडा व नवीन पोसरी येथील रास्त भाव धान्य दुकानाच्या आवारात पार पडला.

यावेळी नविन पोसरी येथे 36 तर मोहोपाडा रास्त भाव दुकानावर 112 खावटी किट वाटप करण्यात आले.याप्रसंगी आदीवासी बांधवांना जवलपास दोन हजार रुपयांचे खावटी किट वाटप करण्यात आले.यात मटकी एक किलो,चवली दोन किलो, हरभरा तीन किलो,पांढरा वाटाणा एक किलो, तूरडाळ दोन किलो,मीठ तीन किलो,साखर तीन किलो, गोडेतेल एक लिटर,मिरची पावडर एक किलो,चहापावडर अर्धां किलो आदी वस्तूंचा भरगच्च किट वाटप करण्यात आला.

याव्यतिरीक्त प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 2000 हजार रुपये जमा होणार असल्याने लाभार्थ्यांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.वाटपप्रसंगी सरपंच ताई पवार, पुंडलिक पवार, मोहोपाडा रास्तभाव धान्य दुकानाचे अनंता पाटील, नविन पोसरी रास्तभाव धान्य दुकानाचे विनोद पाटील,तसेच एकात्मिक विकास प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.