Press "Enter" to skip to content

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागात शिवसंपर्क अभियान

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

कोविडची गंभीर परिस्थिती असल्यामुळे बैठकिच्या माध्यमातून संवाद साधता न आल्याने पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यभरात शिवसंपर्कं अभियान राबविण्यात येत आहे.याविषयी चर्चा विनिमय करण्यासाठी वासांबे जिल्हा परिषद विभागाची बैठक नविन पोसरी येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात शुक्रवारी सायंकाळी पार पडली.

यावेळी मान्यवरांच्याहस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवसंपर्कं अभियानाला सुरुवात करण्यात आली. या बैठकित गोरगरीब जनतेला मदत करणे,दिव्यांगाना रिक्षा व सुविधा मिळाव्यात यासाठी हातभार लावणे,कोविड पाश्र्वभूमीवर गरजूंना मदत करणे तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने कटिबद्ध राहावे असे मत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले.शिवसंपर्कं अभियानाव्दारे महाआघाडी सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ गरीब आणि वंचितांना मिळावा यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने काम करावे असा आशावाद उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.

दरम्यान वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागात शिवसेनेचा बालेकिल्ला होता तो ढासळल्याच्या प्रतिक्रिया तालुकाप्रमुख संतोष विचारे, संपर्कप्रमुख उमेश गावंड, जिल्हा महिला संघटक रेखा ठाकरे यांनी व्यक्त केल्या.यावेली जिल्हा महिला उपसंघटक निलम चोरघे, उपतालुकाप्रमुख रमेश पाटील,माजी उपसभापती गजानन मांडे, महिला उपतालुकाप्रमुख प्रिती कडव, खालापूर तालुका महिला संघटक अनिता पाटील,चौक महिला पदाधिकारी सुनंदा जमदाडे, तालुका युवासेना अधिकारी महेश पाटील, पंचायत समिती विभागप्रमुख अशोक मराजगे,युवासेना विभागप्रमुख संकेत शिंदकर,वासांबे मोहोपाडा महिला विभागप्रमुख सदगुणा पाटील,वासांबे विभागप्रमुख अजित सावंत, पंचायत समिती विभागप्रमुख कृष्णा पाटील, माजी सरपंच भाग्यश्री पवार, ग्रामपंचायत सदस्या मिनाक्षी पाटील, अंजना भोईर, शाखाप्रमुख सुरेश पाटील, मंगेश पाटील, वाहतूक सेनेचे दत्ता देसाई, मंगेश घाडगे,सुमन भोईर,सुवर्णां मुंढे, ज्योती भोईर,संतोष जोडे, विजय सावंत आदींसह मोहोपाडा रसायनी परिसरातील शाखाप्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.