Press "Enter" to skip to content

कुमार लोखंडे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

बँक खात्यात चुकून दुसऱ्याचे पैसे जमा झालेले केले परत

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

सध्याच्या काळात प्रामाणिकपणा क्वचितच पाहायला मिळतो. मात्र काही व्यक्तींकडे आज ही प्रामाणिकपणा आहे याची प्रचिती कोलाड – आंबेवाडी येथे आली. याबाबत सविस्तर माहिती अशी हाती आली.कि आंबेवाडी ग्रामपंचायतीचे होतकरू क्रियाशील सदस्य कुमार जगन्नाथ लोखंडे यांच्या बँक खात्यात त्यांची ठराविक रक्कम जमा होती.

मात्र त्यांच्या बँक खात्यात वीस हजार रुपये जादा जमा झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हे जादा वीस हजार रुपये आपल्या खात्यात कोणाचे जमा झालेत? याचा शोध घेत असताना ही रक्कम चौक – खालापूर येथील व्यापारी बारधन दुरास्वामी तेवर यांच्या कडून चुकून पैसे भरताना दोन अंक चुकल्यामुळे आंबेवाडी ग्रामपंचायत सदस्य कुमार जगन्नाथ लोखंडे यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. जमा झालेले पैसे आपले नसून दुसऱ्याचे आहेत हे कळताच कुमार लोखंडे यांनी त्या व व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून ती रक्कम परत केली.

बारधन तेवर यांनी कुमार लोखंडे यांचे आभार मानून प्रामाणिकपणाचे कौतुक केले

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.