जेष्ठ नेते पै. निजाम भाई सय्यद यांची बकरा ईद सणासुदीला मुस्लीम व सर्व धर्मीय लोकांना भासली उणीव
सिटी बेल | नागोठणे | विशेष प्रतिनिधी |
रोहा तालुका नागोठणे गावातील जेष्ठ नेते पैगंबर वासी निजाम भाई सय्यद यांची बकरा ईद सणानिमिताने मुस्लिम तसेच सर्व धर्मीय लोकांना मनापासून उणीव भासली. काँग्रेस आय पक्षाचे रोहा तालुकाध्यक्ष पैगंबरवासी निजाम भाई सय्यद यांचे एप्रिल महिन्यात दिनांक 17/04/2021रोजी चार महीने पूर्वी अचानक कोरोना आजाराने निधन झाल्याने त्यांनी सर्वांना सोडून जगाचा निरोप घेतला.
या वर्षी बकरा ईद रोहा तालुक्यात मुस्लिम बांधव साजरी करत असताना हिंदू मुस्लिम बांधव तसेच सर्वपक्षीय नेते गण व कार्यकर्ते तसेच पोलीस प्रशासनाला देखील निजाम भाई सय्यद यांची उणीव भासली. दरवर्षी सर्व लोक पै. निजाम भाई सय्यद यांच्या निवासस्थानी ईदीच्या शुभेच्छा देण्यासाठी व सण खाण्यासाठी जात असत. परंतु यावर्षी बकरा ईद हा आनंदाचा सण सर्व मुस्लिम बांधव साजरा करत असताना अतिशय प्रेमळ स्वभावाची व्यक्ती म्हणजेच निजामभाई सय्यद यांची सर्वांना मनापासून आठवण झाली. निजाम भाई यांच्या अचानक जाण्याने आनंदाचा सण हा दुःखाचा सण सर्व धर्मीय लोकांना जाणविला.
निजाम भाई सय्यद यांचा हिंदू मुस्लिम समाजावर दबदबा होता. सर्वांना हवेहवेसे से वाटणारे जग सोडून गेल्याने सर्व लोकांना आज उणीव भासत आहे. पैगंबरवासी निजाम भाई सय्यद ही अशी व्यक्ती होती की ज्यांच्यावर सर्वधर्मीय लोक व सर्व पक्षातील कार्यकर्ते नेतेगण मनापासून प्रेम करत होते. तसेच त्यांचा शब्दाचा आदर व मान राखत होते. अशा कर्तबगार व कर्तुत्ववान, कणखर स्वच्छ विचार स्वच्छ मानाने वागणारे हरहुन्नरी व्यक्ती प्रत्येक व्यक्तीच्या मोठ मोठ्या संकटात हिरहिरीने भाग घेत असत. जात पात न मानता गोरगरीब श्रीमंत यांच्यात भेदभाव न बाळगता त्या व्यक्तीवर आलेले संकटात भाग घेत. त्या व्यक्तीला हसवत खंबीरपणे त्या व्यक्तींच्या पाठी मागे उभा राहून तू घाबरू नकोस अशा शब्दाची बोल बोली करत संकाटात समोरच्या व्यक्तीला हिम्मत देण्याचा काम करून संकटात सापडलेल्या व्यक्ती ची सुटका करण्यात तरबेज असणारी व्यक्ती म्हणजेच पैगंबर वासी निजामभाई सय्यद यांची खरी सर्वांना ओळख आहे.
काँगेस पक्षापूर्वी पै. निजाम भाई सय्यद हे शेतकरी कामगार पक्षात होते. त्यांचे वडील पै.सत्तार भाई सय्यद यांच्या पाऊलावर पाऊल टाकून शे.का.प.चे नेते स्व.प्रभाकर पाटील स्व.दत्ता पाटील राज्यमंत्री कैलास वासी मोहन पाटील यांचे जवळचे सहकारी म्हणून शेकाप पक्षात चिटणीस पदी अनेक वर्षे काम करत होते. पैगंबर वासी निजाम भाई सय्यद यांचे शे का प नेते आम.जयंत पाटील माजी. आ.पंडित पाटील माजी.राज्य मंत्री मीनाक्षी पाटील माजी.आ.विवेक पाटील माजी खासदार रामशेठ ठाकूर खासदार सुनील तटकरे या नेत्यांच्या बरोबर देखील फार जवळचे घरातील संबंध होते.
राजकीय व्यासपीठांवर भाषणबाजीत कलालबंगडी तोफ असे रायगड जिल्ह्यात सर्वांनाच्या ओळखीचे बुलंद आवाज म्हणजे पै. निजाम भाई सय्यद. काही वर्षांपूर्वी शे का पक्षाचा पक्षत्याग करून माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश करून पेण मतदार संघाचे आमदार मा.रवी पाटील यांच्या नेतृत्वातखली स्टार प्रचारक म्हणून व रायगड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस पदी काम केले. आम.रवी पाटील यांनी पैगंबर वासी निजाम भाई सय्यद यांना संसदपटूची उपमा दिली होती. कार्यसम्राट कामाची ओळख असलेले पैगंबरवासी निजाम भाई सय्यद काँग्रेस आय पक्षाचे डॅशिंग नेतृत्व करत असताना व रोहा तालुकाध्यक्ष पदी विराजमान असताना अचानक जग सोडून गेल्याने काँग्रेस पक्षाचे व मुस्लीम समाज तसेच बहुजन समाजाचे देखील नुकसान झाले आहे.
सर्व जातीय धर्मातील लोक आम्ही पोरके झाल्याचे सांगत आहेत. पैगंबरवासी निजाम भाई सय्यद या व्यक्तीला दरवर्षी त्यांच्या राहत्या निवास्थानी रमजान ईद व बकरा ईद सणानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरिता नागोठणे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब सर्व पोलीस ताफा कर्मचारी यांना घेवून निजाम भाई सय्यद यांना ईद सणासुदीला शुभेच्छा देत असत. तसेच सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते गण पै. निजामभाई सय्यद यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा देत असत. परंतु यावर्षी पैगंबरवासी निजाम भाई सय्यद हे आपल्या गावात नसल्याने तसेच ते आपल्यातून अचानक जग सोडून गेल्याने पै. निजामभाई सय्यद यांच्यावर प्रेम करणारे लोकांच्या डोळे पाणावले.
दमदार दिलदार हरहुन्नरी व्यक्ती पै.निजाम भाई सय्यद हे प्रत्येक व्यक्तीच्या संकटात हिरहिरीने भाग घेऊन त्या व्यक्तीची त्या संकटातून मुक्तता कशी करून द्यायची त्या व्यक्तीला कसा सोडवायचा अशी आपल्या अंगात असलेली कला कृती असणारी व्यक्ती पैगंबरवासी निजाम भाई सय्यद. ही व्यक्ती अचानक जग सोडून गेल्याने संपूर्ण रायगड जिल्हा व रोहा तालुक्यातील मुस्लिम समाज तसेच सर्व जातिधर्माती लोक सर्व पक्षातील नेते गण व कार्यकर्ते हाल हाल व्यक्त करीत आहेत.
ना चिट्ठी ना कोई संदेश वो कोनसा है देश जहाँ तुम चले गये.
उम्र भर अब पुकारा करे उनका नाम ओ फीर नही आते.
खरंच पैगंबर वासी निजाम भाई सय्यद सारखे प्रत्येक समाजात हीरे रत्न वेळो वेळी जन्माला येत नाहीत.
बकरा ईद सणानिमित्ताने पैगंबर निजाम भाई सय्यद या हीरा रत्नाला सर्व धर्मीय लोकांन कडून खरी श्रद्धांजली अर्पण








Be First to Comment