सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेचे राष्ट्रीय महासचिव जगदिश गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य शाखेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.या कार्यकारणीत राज्य अध्यक्षपदी भिकाजी कांबळे, सरचिटणीसपदी सुशील वाघमारे,कोषाध्यक्षपदी विजय कांबळे यांची निवड करण्यात आली.
दरम्यान सुशील वाघमारे यांनी या अगोदर तालुका शाखा पनवेल, अलिबाग येथे तालुका स्तरावर व नंतर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी यशस्वी कामगिरी केली आहे.त्यांच्या जिल्हा अध्यक्षपदाच्या कार्यकाळात रिस ( मोहोपाडा) येथे सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर भवन ( जिल्हा कार्यालय) उभारण्यात आले.त्याचीच दखल घेऊन २०१८ साली त्यांची महाराष्ट्र राज्य शाखेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.तद्नंतर नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या निवड प्रक्रियेत त्यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
सदर निवडीमुळे जिल्हा भरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.याबाबत त्यांनी संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर, राष्ट्रीय महासचिव जगदिश गवई,सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष भिकाजी कांबळे यांना धन्यवाद दिले आहेत.








Be First to Comment