सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
लोधीवलीवाडी येथील आदिवासी बांधवांना एकात्मिकक विकास प्रकल्प, यांच्याअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप खावटी स्वरूपात करण्यात आले.
यात गवया किटचे वाटप लोधीवली आदिवासीवाडी येथे पंढरी सूर्यवंशी, कांबळे मॅडम, रणदिवे मॅडम, पत्रकार एकनाथ सांगळे, भूईकोट व कर्मचारी यांच्यामार्फत सर्व आदिवासी बांधवांना वाटप करण्यात आले.
या किटमध्ये पुढीलप्रमाणे जीवनावश्यक वस्तू होत्या. मटकी एक किलो,चवळी दोन किलो,हरभरा तीन किलो,
पांढरा वाटाणा एक किलो,तूरडाळ दोन किलो, मीठ तीन किलो,साखर तीन किलो,गोडेतेल एक लिटर,
मिरची पावडर एक किलो,
चहा पावडर अर्धा किलो
असा 18 वस्तूंचा भरगच्च किट देऊन याव्यतिरिक्त प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यावर रुपये 2000 जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती दिल्याने प्रत्येक आदिवासीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.








Be First to Comment