Press "Enter" to skip to content

वाशिवली ठाकूरवाडी आदिवासी बांधवांना फळझाड वाटप

नोवोझाईम दक्षिण आशिया लि.अनार्डे फाऊंडेशनचा पुढाकार

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

वृक्ष लागवड आणि संवर्धन ही जरी काळाची गरज असली तरी त्याचं सोबतीने त्यांची देखभाल करताना त्यांच्यापासून उत्तम प्रकारची फळे मिळवून आपल्या कुटुंबाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी व एका प्रकारे शास्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी वाशिवली ठाकूरवाडी, ग्रूप ग्राम पंचायत वडगाव,या हद्दीतील सिएसार कार्यक्रमा अंतर्गत नोवोझाईम दक्षिण आशिया लि.यांच्या कडून फळझाड वाटप कार्यक्रम,अनार्डे फाऊंडेशनचा, मुंबई यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नोवोझाईम दक्षिण आशिया यांचे मुख्य व्यवस्थापक संजय सुर उपस्थित होते. तसेच कंपनीतील अनेक कर्मचारी श्रमदानासाठी आले होते.कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वृक्ष व फळबाग लागवडीचे महत्व ग्रामस्थांना उलगडून सांगितले. शिवाय पर्यावरणाचे संतुलन राखताना निर्माण होणाऱ्या रोजगार संधीही उलगडून सांगितल्या.

या प्रसंगी ग्रामस्थांना सुधारित प्रजातीची केळी, लिंबू; आंबा, सिताफळ, पेरू यांची कलमे अशी प्रत्येक कुटुंबाला १२ प्रमाणे एकूण ९५ कुटुंबांना ११४० झाडे वितरीत करण्यात आली.

शिवाय येथील प्राथमिक शाळेच्या आवारात व शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड करून या लागवडीची औपचारिक सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमात सिप्ला सिएसार प्रमुख उल्का धुरी ,अनार्डे फाऊंडेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर ग्रामस्त उपस्थित होते.या कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद लाभला व या कामाबद्दल समाधानही व्यक्त करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.