Press "Enter" to skip to content

तुळशीराम लोखंडे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

रोहा तालुक्यातील चिल्हे गावचे प्रगतशील शेतकरी तथा दुग्ध व्यवसायिक सामाजिक आध्यात्मिक तथा धार्मिक कार्यक्रमाची आवड असलेले हभप तुळशीराम रामचंद्र लोखंडे यांचे वयाच्या (७४ ) वर्षी आषाढी एकादशीलाच त्यांचे हृदय विकाराच्या झडक्याने दुःखद निधन झाल्याने लोखंडे परिवारावर व चिल्हे गावावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे .

तुळशीराम लोखंडे हे शालेय शिक्षण घेत असतांना वडिलांबरोबर शेती आणि गुरांचा संभाळ करण्याची आवड त्यात गाई म्हशींची अधिक जोपासना करत ते या परिसरात दुग्ध व्यवसाय करत असत बाहे सोसायटीचे माजी चेअरमन होते तळवली चिल्हे बाहे आशा तीन गावांचा सोसायटीचा कारभार त्यांनी अति उत्तम पद्धतीने त्या काळात पाच वर्षे सांभाळला होता.

आखाडा खेळातील उत्तम बनाटी खेळपट्टू तर खेळात कमान करून डोळ्याने सुई उचलणे हा त्यांचा प्रमुख खेल व छंद वारकरी असल्याने आळंदी वारी रोहा तालुका प्रेमवर्धक वारकरी संप्रदाय पायी दिंडी या दिंडीतून नेहमी वारी करणारे दिंडीतील भाविकांना उत्तम असे भोजन बनवून वारीची सेवा करणारे सेवेकरी आशा महान वारकऱ्याला पंढरपूर आषाढी एकादशी वारी आणि या दिवशी दुःखद निधन येणे म्हणजे जीवनाला मोक्षप्राप्ती मिळणे होय.

वडिलांच्या पश्चात त्यांनी पत्नी समावेत आपल्या शेतीत लक्ष केंद्रित करत भात पीक व कडधान्याचे विविध पीक घेत पशूंचे पालन देखील उत्तम प्रकारे करत गाई म्हशी यांची जोपासना केली शांत आणि मनमिळाऊ स्वभाव सर्वाना सामाजिक कार्यात हातभार लावणारे लोखंडे अचानक निघून गेल्याने साऱ्यांना दुःख झाले आहे .

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी तीन मुले दोन मुली एक भाऊ दोन बहिणी सुना भावजय पुतणे नातवंडे असा मोठा लोखंडे परिवार असून त्यांचे पुढील दशक्रिया विधी गुरुवार २९ जुलै रोजी तर उत्तर कार्य रविवार १ ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या निवास्थांनी मौजे चिल्हे येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांकडून प्राप्त झाली आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.