Press "Enter" to skip to content

एमआयडीसी औद्योगिक प्रकल्पाला आमचा विरोध – संजय जांभळे

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

वडखळ विभागात होणा-या एमआयडीसी औद्योगिक प्रकल्पाला येथील स्थानिक भुमिपुत्रांचा कायम विरोध असल्याने त्या लढ्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या बरोबर असून मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे ज्या ठिकाणी अन्याय होत असल्यास तीथे शिवसैनिक म्हणून खंबीर उभे असल्याचे शिवसेनेचे माजी जि.प.सभापती संजय जांभळे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी पुढे बोलतांना त्यांनी अधिक सांगितले की जेएसडब्ल्यु कंपनीने स्थानिक तरुणांना नोकरी पासून वंचित ठेवले आहे त्याकरिता लवकरच आवाज उठविणार असल्याचे सांगून मी या अगोदर काही कारणास्तव नाराज होतो त्यामुळे इतर पक्षात गेलो मात्र मी खरा शिवसैनिक असून आता पेण तालुक्यात शिवसेना वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत यासह नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुरस्थीती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी असे त्यांनी शेवटी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.