सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत मधील इनरव्हील क्लब नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असतात त्याचाच भाग म्हणून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील आनंदवाडी मोग्रज येथील स्वामिधाम येथे इनरव्हील क्लबच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, स्वामींचे दर्शन घेऊन तेथील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, त्यात कलमी आंब्याची रोपे, लिंबू, पेरू, चिकू, पपई ची रोपे तसेच त्याकरिता लागणारे खत आणि बारा माही फुलणारा मोगरा, पाच रंगाची जास्वंदीची रोपे अशी अनेक फुल झाडे यांचे वृक्षारोपण करण्यात आले.
जेणेकरुन त्यातून येणारे उत्पादन तेथील रहिवासीना उपयुक्त होईल. आदिवासी पाड्यातील मुलांना शाळे करिता उपयोगी वह्या पेन पेन्सिल, रंगपेटी,रंगकाम वह्या (ड्रॉइंग बुक) देण्यात आले, तसेच चॉकलेट आणि बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले. क्लब च्या नवनिर्वाचित अध्यक्षा करूणा पराडकर, सेक्रेटरी मोनिका बड़ेकर, माजी अध्यक्षा प्राची चौडिया, आयसओ शिल्पा दगडे, सी.सी ज्योत्स्ना शिंदे, उत्तरा वैद्य, सुलोचना गायकवाड, सरस्वती चौधरी, सुरेखा पाटील, वैशाली दांडेकर, जयश्री जोशी आदी सदस्य उपस्थित होत्या.








Be First to Comment