सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
लायन्स क्लब आँफ रोहा व किल्ला ग्रा. पं.यांच्या वतीने अशोक नगर किल्ला येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
यावेळी लायन्स क्लब रोहाचे अध्यक्ष अध्यक्ष अँड.हेमंत गांगल,प्रेसिडेंट नूरभाई रोहावाला,सैफीभाई रोहावाला,सेक्रेटरी जयदेव पवार,उपसरपंच राकेश बामुगडे ,सदस्य दीपक जमदाडे,
ग्रामसेविका पुनम पाटील,बाळा पाबरेकर, महेश बामुगडे, रुपेश बामुगडे, विजय दळवी, नरेश चांदोरकर ,अध्यक्ष संदीप पालकर, जितेंद्र पालकर, विनोद चांदोरकर,सतीश पालकर ,अशोक चांदोरकर ,अतिश वाटवे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होते.

या वृक्षारोपण कार्यक्रमातंर्गत अशोक नगर किल्ला परिसरात लायन्स क्लब आँफ रोहा व किल्ला ग्रा. पं.यांच्या वतीने विविध प्रकारच्या व्रुक्षांची लागवड करुन पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. तर व्रुक्षांच्या सुरक्षिततेसाठी पत्र्याचे ड्रमही सभोवताली मांडण्यात आले आहे. तर व्रुक्ष आपले सर्वस्व असून आपल्या जीवनात त्यांचे मोलाचे स्थान असल्याने प्रत्येकाने स्वत:हून व्रुक्षारोपणाचा उपक्रम हाती घेऊन झाडांचे संगोपन केले पाहिजे. अशाप्रकारचे उद्बोधन लायन्स क्लब यांच्या वतीने यावेळी करण्यात आले.









Be First to Comment