Press "Enter" to skip to content

सर्पमित्र अजय भोसले याने दिले आठ फुट अजगराला जीवदान

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील नडवली गावचा सुपुत्र व सर्पमित्र म्हणून नावारूपाला आलेल्या अजय भोसले याने आठ फुटी लांबीच्या अजगरास सुरक्षितपणे पकडून जीवदान दिले आहे.

मागील आठवड्यात त्याने त्याच्याच गावातील एका गुरांच्या गोठ्यात दडून बसलेल्या दहा फुट लांब असलेल्या धामण सापास जीवदान दिले होते.तर दोनच दिवसापूर्वी शेजारील तळवली या गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बामणे यांच्या निवासस्थानी घराच्या पाठीमागील बाजूस अजगर असल्याची माहिती मिळताच अजय तेथे येऊन बिनधास्तपणे सुमारे आठ लांबीच्या अजगरास मोठ्या कौशल्याने पकडून जीवदान देऊन सुरक्षित जागेत नेऊन सोडले आहे.त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. तर सर्पमित्र अजय याने आतापर्यंत विविध ठिकाणी विविध जातीचे विषारी व बिनविषारी साप पकडून त्यांना जीवदान दिले आहे. तर साप आपले मित्र असून मारू नका.ते ही पर्यावरणाचे मुख्य घटक असल्याचा प्रचार व प्रसार तो करीत असून सापांबद्दल प्रबोधनाचे कार्य करीत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.