Press "Enter" to skip to content

आदर्श क्रुषीनिष्ठ शेतकरी नारायण थिटे यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील ताज्या भाजीपाला पिकासाठी विशेष प्रसिद्ध असणाऱ्या क्रुषीनिष्ठ बाहे गावातील आदर्श क्रुषीनिष्ठ शेतकरी नारायण हरी थिटे थिटे यांचे
अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.त्या समयी ते ९७ वर्षांचे होते.

आपल्या संपुर्ण आयुष्यात त्यांनी शेती हाच व्यवसाय स्विकारून व शेतीला जोडधंदा म्हणून भाजीपाला पिकविणे, पशूपालन व विशेष म्हणजे शेळीपालन हा त्यांचा व्यवसाय होता.संपूर्ण आयुष्यात त्यांनी शेती क्षेत्रावर विशेष लक्ष देऊन मेहनत करून आपल्या संसाराचा गाडा हाकला.एक आदर्श तसेच क्रुषीनिष्ठ शेतकरी म्हणून त्यांचे विशेष नावलौकिक होते.कोरोना नियमावरीचे पालन करून ग्रामस्थ व त्यांच्या जवळच्या नातेवाईक मंडळींनी त्यांचे अंत्यविधी पार पाडले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन,जावई व नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रिया गुरुवार दि.२२ जुलै रोजी तर अंतिम धार्मिकविधी रविवार दि.२५ जुलै रोजी बाहे येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.