सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर यांनी नुकताच आपल्या लवाजम्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विलास चौलकर यांच्या सारखा मुरब्बी राजकारणी सर्व समाजामध्ये जिव्हाळ्याचे संबध असलेले खरे खुरे समाजसेवक विलास चौलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यामुळे नागोठणे शहरासह विभागात राष्ट्रवादी कॉग्रेसला बळकटी मिळालेली असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे.
विलास चौलकर यांच्या प्रवेशाने आम्हा महिला पदाधिका-यांना व महिला कार्यकर्त्यांना पक्षात मोठा आधार मिळाला असून पक्षात काम करण्यासाठी आमच्यात एक जिद्द व हुन्नर निर्माण झाली असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी नागोठणे शहर अध्यक्षा सुजाता जवके यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस आशा शिर्के, नागोठणे शहर अध्यक्षा सुजाता जवके, उपाध्यक्षा प्रतिभा तेरडे आदी महिला पदाधिका-यांनी विलास चौलकर यांच्या निवास्थानी जाऊन चौलकर यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी सुजाता जवके या राष्ट्वादी काँग्रेसच्या नागोठणे महिला आघाडीच्या वतीने भावना व्यक्त करताना बोलत होत्या.
यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या श्वेता चौलकर, राष्ट्रवादीचे तालुका कार्यकारणी सदस्य सुधाकर जवके, निलेश म्हात्रे, शरद झेमसे आदी उपस्थित होते.
सुजाता जवके भावना व्यक्त करताना म्हणाल्या की, आता आम्हाला आमच्या पक्षात आमचा हक्काचा माणूस मिळालेला आहे. नागोठणे ग्रामपंचायत सरपंच म्हणून विलास चौलकर यांनी पारदर्शक व प्रामाणिक काम केले असल्याचे सदस्य म्हणून जवळून पाहिलेले आहे. चौलकर यांच्यामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होणार असून विलास चौलकर यांच्या सारखा प्रेमळ, परोपकारी, अनुभवी, कार्यकुशल व्यक्तिमत्व असलेला नेता आमच्या पक्षात सामील झाल्यामुळे आम्हा महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षात काम करण्याचा उत्साह द्विगणित झाला असल्याची भावना शहर अध्यक्षा सुजाता जवके यांनी व्यक्त केल्या. दरम्यान राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते विलास चौलकर यांच्या निवासस्थानी जाऊन चौलकर यांना शुभेच्छा देत असल्याने ते भारावून गेले आहेत.








Be First to Comment