सुकेळी येथील एका एटीएम मध्ये बिघाड तर दुस-या एटीएम मध्ये पैसे नसल्याने नागरिकांची गैरसोय
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
नागोठण्याजवळच असलेल्या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील सुकेळी येथे असणा-या एका एटीएम मशिनमध्ये दोन ते तीन दिवसांपासुन पैसे नसल्यामुळे तसेच दुस-या एटीएम मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे येथील कामगार वर्ग व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
सुकेळी येथिल जिंदाल कंपनीमध्ये अॅक्सिस बँकेचे तर जिंदाल चॅरिटेबल रुग्णालयाच्या बाजुला स्टेट बँक आॅफ इंडिया अशा दोन बँकांचे एटीएम आहेत. पंरतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासुन कंपनीमध्ये असलेल्या अँक्सिस बँकच्या एटीएम मशिनमध्ये बिघाड झाला आहे तर जिंदाल रुग्णालयाच्या बाजुला असलेल्या एसबीआयच्या एटीएम मशिनमध्ये पैसे नसल्याने या विभागातील कंपन्यांत काम करणाऱ्या मोठ्या संख्येतील कामगार वर्गाची तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
या विभागामध्ये पाच ते सहा कंपन्या असुन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. तसेच हे दोन्ही एटीएम महामार्गालगत असल्यामुळे या दोन्ही एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्याचप्रमाणे या दोन्ही एटीएम मध्ये दोन ते तीन महिन्यांपासुन सुरक्षारक्षक नसल्यामुळे काही अशिक्षित नागरिकांना एटीएम मधुन पैसे काढणे, नविन एटीएम कार्ड चालु करणे अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यांची गैरसोय होत आहे.








Be First to Comment