राष्ट्रवादीचे नेते विलास चौलकर यांचा विश्वास
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
राष्ट्वादी काँग्रेस पक्षात तुम्हाला मानसन्मानाने वागणूक दिली जाईल. तसेच तुमच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्वादी पक्षाला तुमच्या दांडगा अनुभवाचा फायदा निश्चित होणार असून तुमच्या पक्ष प्रवाशाने कोळीवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नंबर होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही असा विश्वास राष्ट्वादी काँग्रेसच्या पेण-रोहा-सुधागड विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष विलास चौलकर यांनी राष्ट्वादी काँग्रेस मध्ये नुकतेच प्रवेश केलेले कट्टर शिवसैनिक श्याम पाटील यांच्या निवासस्थानी व्यक्त केला.
नागोठण्याच्या कोळीवाडा भागातील कट्टर शिवसैनिक श्याम विठोबा पाटील यांनी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. श्याम पाटील यांच्या सारखा कडवट शिवसैनिकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाच कसा अशी चर्चा नागोठणे परिसरात ऐकावयास मिळत आहे. नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व राष्ट्वादीच्या पेण-रोहा-सुधागड मतदार संघांचे उपाध्यक्ष विलास चौलकर यांनी श्याम पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन पाटील कुटुंबीयांची नुकतीच भेट घेतली.
चौलकर यांनी श्याम पाटील यांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत करून पक्ष मजबुतीकरणा संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग नागोठणेकर, युवा कार्यकर्ते रविंद्र वाजे, विठोबा पाटील, रुक्मिणी विठोबा पाटील, संतोष विठोबा पाटील, दिनेश श्याम पाटील आदी उपस्थित होते.








Be First to Comment