Press "Enter" to skip to content

नावढे एमआयडीसी प्रकल्प रद्द पेणचा मात्र गुलदस्त्यात

पालकमंत्री व स्थानिक आमदारांनी विधानसभेत आवाज उठवावा शेतकऱ्यांची मागणी

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील गडब, डोलवी, वडखळ, बोरी या चार ग्रामपंचायतीच्या हद्दीत होणा-या 2 हजार 120 हेक्टर जागेवरील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा विरोध दर्शविला असून याकरीता मोर्चे, आंदोलन करूनही सदर प्रकल्प रद्द करावा यासाठी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार रविंद्र पाटील यांना निवेदन दिले आहे.मात्र तरीही शेतकऱ्यांना याबाबतच्या नोटीसी व जमिनी मोजण्याचे कार्य सुरू आहे त्यामुळे खालापूर तालुक्यातील नावढे येथे होणारा एमआयडीसी प्रकल्प शासनाने रद्द केल्याची घोषणा नुकतीच केली असल्याने पेणचा एमआयडीसी प्रकल्प अजुनही गुलदस्त्यातच असल्याने येथील पेणच्या प्रकल्पासाठी पालकमंत्री व स्थानिक आमदार यांनी याबाबतचा आवाज विधानसभेत उठवावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नावढे परिसरात होणाऱ्या एमआयडीसी प्रकल्प रद्द करावा येथील शेतकरी एक इंचही जागा या प्रकल्पाला देणार नाही असा पवित्रा लोकप्रतिनिधींनी घेतल्यामुळे शासनाला अखेर नावढे येथील एमआयडीसी प्रस्तावित प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा करावी लागली मात्र तोच पेण मधील प्रकल्प रद्द व्हावा याकरिता शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.त्यामुळे पेण तालुक्यातील 2 हजार 120 हेक्टरवर होणा-या एमआयडीसी प्रकल्पाला येथील शेतकरी जमिनी देणार नसल्याचा पवित्रा वारंवार शेतकऱ्यांनी घेतला आहे.

नुकतेच शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालया जवळ धरणे आंदोलन केले असता हा प्रकल्प रद्द करावा असे निवेदन लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना देण्यात आले आहे मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी सोडून उर्वरित जमिन मोजण्यात येणार आहे त्यामुळे पेणचा एमआयडीसी प्रकल्प आजही गुलदस्त्यातच आहे.त्यामुळे शासनाने खालापूर तालुक्यातील नावढे येथील प्रकल्प जर रद्द केला आहे तर पेणचा सुद्धा रद्द करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.