सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
मोहोपाडा आळी आंबिवली येथील कावडेनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांसमोर रस्त्यांची समस्या भेडसावत होती.या परिसरात झाडाझुडपातून मार्ग काढताना नागरिकांना खुपच त्रास व्हायचा. ही समस्या महिला व बालकल्याण माजी सभापती तथा विद्यमान सदस्या उमाताई मुंढे यांनी लक्षात घेऊन जिल्हा परिषद निधीतून कावडेनगर परिसरात रस्त्याचे बारा दिवसांत काॅक्रीटीकरण करुन तेथील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
आळी आंबिवली कावडेनगर परिसरात लोकवस्ती वाढत असून या परिसरातील नागरिकांसमोर रस्त्यांची मुख्य समस्या होती. या परिसरातील नागरिकांना विशेषतः लहान मुलांना झाडाझुडपातून रस्ता शोधत प्रवास करावा लागायचा. शिवाय आसपास ओसाड जमीन असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची मोठी भीती नागरिकांच्या मनात होती.सदर समस्या तेथील नागरिकांनी माजी सरपंच संदिप मुंढे यांना सांगताच त्यांनी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण माजी सभापती तथा विद्यमान सदस्या उमाताई मुंढे यांच्याकडे मागणी करुन त्वरित सोडविण्याची मागणी केली.

यावर सकारात्मक विचार होवून आळी आंबिवली कावडेनगर परिसरातील जवलपास तिनशेपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्याचे काॅक्रीटीकरणाचे काम सुरू करुन हा रस्ता बारा दिवसांत पुर्ण केला आहे.या रस्ताचा उद्घाटन सोहळा मिलिंद कावडे यांच्या आवारात पार पडला.
यावेळी रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल हभप शिवराम लक्ष्मण कावडे व त्यांच्या पत्नी सुमती कावडे यांचे कावडेनगर परिसरातील नागरिकांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले तसेच माजी सरपंच संदिप मुंढे व त्यांच्या पत्नी उमाताई मुंढे यांनी परिसरातील रस्त्यांचे काॅक्रीटीकरण करुन समस्या सोडविल्याबद्दल तर माजी उपसरपंच दत्ता शिंदे यांनी या परिसरासाठी पाणी समस्या सोडविल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सन्मान केला.
दरम्यान कावडेनगर परिसरातील काॅक्रीटीकरण रस्त्याच्या नामफलकाचे लोकार्पण होवून महिला व बालकल्याण माजी सभापती तथा विद्यमान सदस्या उमाताई मुंढे यांच्याहस्ते फित कापून काॅक्रीटीकरण रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.यानंतर उपस्थित मान्यवरांनी या रस्त्याची पाहणी केली.

परिसरातील नागरिकांना मोठा दिलासायाप्रसंगी महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे, सरपंच ताईं पवार, उपसरपंच राकेश खारकर, माजी सरपंच संदिप मुंढे,माजी उपसरपंच दत्ता शिंदे,माजी उपसरपंच संदेश जाधव, ग्रामपंचायत सदस्या अंजना भोईर, स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड,शंकर भोईर,सुभाष आहिर, मंगेश पांगत,वर्षां पाटील,सौ.गायकर, मिलिंद कावडे, सुनील जाधव,हभप शिवराम कावडे व सुमती कावडे,हभप खाने महाराज, श्री जाधव आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संतोष चौधरी यांनी केले.








Be First to Comment