Press "Enter" to skip to content

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने पोसरी येथे आढावा बैठक

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शिव संपर्क अभियान चालू आहे या अभियानाच्या निमित्ताने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठक सुरभी हॉल, पोसरी येथे संपन्न झाली या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत,आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते.

यावेळी मंत्री महोदयांनी मनोगत व्यक्त करत असताना आमदार महेंद्र थोरवे यांनी कमी कालावधीत केलेल्या विकास कामांचे कौतुक केले. तर शिवसैनिकांना संबोधित करत असताना ते म्हणाले की, जसा महाविकास आघाडीतील प्रत्त्येक घटक पक्षाला स्वतःची पक्ष संघटना मजबूत करण्याचा अधिकार आहे तसा शिवसेना पक्ष वाढीसाठी मुख्यमंत्री त्या अधिकारानुसार शिवसंपर्क अभियान राबवित आहेत. शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला बरंच काही दिलं परंतु आपण शिवसैनिक पक्षासाठी काय योगदान देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. भविष्यकाळात मी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री या नात्याने आपल्याला या मतदार संघात कोणतेही नवीन कॉलेज काढायचे असेल तर सर्वतोपरी परवानगी करीत मी मदत करेन असे आश्वासन दिले.

याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापूर परिसरात मंजूर केलेल्या विकास कामांची आठवण पुन्हा एकदा करून दिली. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे कुटुंब प्रमुख म्हणून काम करत आहेत ते घराघरात पोहचविणे हे आपल्या सर्व शिवसैनिकांचे कर्तव्य आहे आणि आपल्याला त्याचा सर्वस्वी अभिमान आहे असे मत व्यक्त केले.

या संपर्क अभियानाअंतर्गत सुनील भालीवडे-राष्ट्रवादी सदस्य,विलास श्रीखंडे-मा रायगड जिल्हा सहसंयोजक, मंगेश काळोखे भाजपा कार्यकर्ते,
मचिंद्र पादीर- भाजप कार्यकर्ते,
शिंगोले- भाजप कलंब जि प विभाग प्रमुख या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

यावेळी रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील,उपजिल्हाप्रमुख भाई गायकर ,महिला जिल्हा संघटिका रेखाताई ठाकरे , सल्लागार भरत भाई भगत विधानसभा संघटक संतोष शेठ भोईर , जिल्हा नियोजन समिती सदस्य नवीन दादा घाटवळ, कर्जत तालुका प्रमुख उत्तम दादा कोळंबे खालापूर तालुका प्रमुख संतोष विचारे, उपजिल्हा आधिकरी प्रशांत खांडेकर तालुका युवा सेना अधिकारी अमर मिसाळ खालापूर तालुका युवा सेना अधिकारी महेश पाटील,खोपोली कर्जत मधील सर्व उपतालुका प्रमुख, नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.