सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
कौशल्य विकास उपक्रम आदिंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कोरोनजन्य परिस्तिथीचे सर्व नियम पाळून जन सामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती विविध स्वच्छता अभियान, आरोग्य विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून जन शिक्षण संस्थान रायगड हे दि. 15 जूलै, 2021 ते 30 जुलै 2021 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा सामाजिक, आर्थिक, स्वच्छता सर्वेक्षण मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे.

याच उपक्रमाचा भाग म्हणून जनशिक्षण संस्थान रायगड, नढाळ आदिवासी वाडी-खालापूर व ग्रुप ग्रामपंचायत लोधिवली खालापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे स्वच्छता पंधरवडा जल्लोषात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी मोफत लिक्विड हॅन्डवॉश, सॅनिटायझिंग स्प्रे शिकवण्यात आले. कापडी मास्क, कापडी पिशव्या, सॅनिटरी पॅड यांचे देखील वाटप करण्यात आले. त्याचबरोबर स्वच्छतेची शपथ घेण्यात आली, कौशल्यावर आधारीत घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली तसेच सामाजिक सर्वे आणि वृक्षारोपण देखील करण्यात आले.
स्वच्छता पंधरवडा अंतर्गत नढाळ आदिवासी वाडी येथे सामाजिक,आर्थिक व स्वच्छता सर्वेक्षण मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम स्वच्छतेवर आधारीत कार्यक्रम साजरा करण्यात आला.

संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैय्या, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी व व्यवस्थापक या मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत स्कील से समृद्ध स्वच्छता कार्यक्रम राबवित असतांना वरील ठिकाणी सदर उपक्रम जन शिक्षण संस्थान रायगड यांनी ‘‘ स्वच्छता पंधरवडा ” हा कार्यक्रम राबविला. याप्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक विजय हिरामण कोकणे, शुभम रामदास दळवी (ग्रामपंचायत लोधिवली कर्मचारी),अंकुश नारायण पवार (ग्रामपंचायत लोधिवली कर्मचारी), दिगंबर मोरे, जन शिक्षण संस्थान रायगडचे कर्मचारी सुकन्या नांदगावकर व कल्पना म्हात्रे (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), हिमांशू भालकर, साधन व्यक्ती- संजय सांगळे, मीनाक्षी पवार, सिद्धी साळुंके, अपर्णा दिगंबर मोरे हे सर्व “स्वच्छता पंधरवडा” कार्यक्रम राबवित असतांना उपस्थित होते.
अशाप्रकारे नढाळ आदिवासी वाडी-खालापूर, ग्रुप ग्रामपंचायत लोधिवली खालापूर व जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या साधन व्यक्ती व कर्मचारी यांच्या सहकार्यातून “स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.








Be First to Comment