Press "Enter" to skip to content

नेरळ सरपंच उषा पारधी यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या उषा पारधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

नवनिर्वाचित सरपंच उषा पारधी यांनी बबन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट भेटली. राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे मंत्री, शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी नेरळ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच उषा पारधी यांना वर्षा बंगल्यावर पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबन पाटील, कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, आरपीआयचे जिल्हा संपर्कप्रमुख धर्मानंद गायकवाड, माजी सभापती सुजाता मनवे तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहिले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.