Press "Enter" to skip to content

उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांना मदतीचा हात

सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, सीमा घरत व उरण सामाजिक संस्थेकडून धान्य वाटप

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

शासनाच्या खाव टी योजने अंतर्गत बेलवाडी सारडे, पूनाडे वाडी, जांभूळपाडावाडी चिरले, जासई वाडी जासई येथील कातकरीवाडी वर धान्य वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षक वर्गाने सर्व आदिवासी बांधवांना धान्याचे वाटप करून त्यांची योग्य प्रकारे ऑनलाईन नोंदणी देखील करून घेतली.

बेलवाडी सारडे कातकरी वाडी वर सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर , सीमा घरत महिला प्रमुख उरण सामाजिक संस्था यांच्याकडून देखील धान्याचे वाटप करण्यात आले. चंदू नारायण वाघमारे ह्या महिलेचे घर कोसळून सर्व सांमानाची नासधूस झाली होती. परंतु संतोष पवार यांनी तिला धीर दिला. प्रमोद ठाकूर यांनी तिला जसे हवे तसे घर बांधून देण्याची जबाबदारी घेतली.

तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि गट विकास अधिकारी निलम गाडे मॅडम यांच्या आदेशानुसार तलाठी जोशी तात्या आणि ग्रामसेविका मॅडम यांनी स्वतः वाडी वर जावून पंचनामा करून पुढील कार्यवाही साठी तहसील कार्यालयात पाठवला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण वरून प्रकल्प अधिकारी यांच्या आदेशानुसार भानुशाली फोन आला होता, ते स्वतः सदर घटनेची तपासणी करण्यासाठी येणार असून लवकरात लवकर सदर महिलेस घर बांधून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

बेलवाडी वरील सर्व कुटुंबांना भेटण्यासाठी उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार सर, महिला प्रमुख सीमा घरत मॅडम,सुरक्षा रक्षकांचे कैवारी प्रमोद ठाकूर, तरुण कार्यकर्ता हर्ष पवार, जयवंत काका, खाव टी योजनेचे उरण तालुका प्रमुख अप्पा सो मोरे सर , दत्ता पाटील सर,खंडू पिचड सर, मोकल सर, भैरू जाधव सर, सचिन माने आदींनी उपस्थित राहून वाटप केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.