Press "Enter" to skip to content

भाजप कर्जत मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षपदी ॲड. प्रिती तिवारी

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या कर्जत मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षपदी ॲड. प्रिती तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार भाजप कर्जत तालुका महिला आघाडी अध्यक्षा स्नेहा गोगटे यांनी ॲड. प्रिती तिवारी यांची कर्जत मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे, हे नियुक्ती पत्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ॲड. प्रिती तिवारी यांना देण्यात आले.

याप्रसंगी किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनिल गोगटे, ठाणे कोकण विभाग सोशल मिडिया म. मो. संयोजिका ॲड. गायत्री परांजपे,भटक्या विमुक्त कोकण प्रमुख सुषमा ढाकणे, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा गोगटे, चिंचवली ग्रामपंचायत सदस्य तसेच तालुका महिला मोर्चा सदस्य सुप्रिया भगत, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी,अभिषेक तिवारी, अंकिता तिवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.