सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत नगर परिषदेच्या सफाई कामगारांना पावसाळ्यासाठी रेनकोट आणि गमबूट चे वाटप करण्यात आले.
देशावर राज्यावर कोरोना महामारीचे संकट आले आहे, या काळामध्ये देशाने आणि राज्याने लॉक डाऊन केले होते, मात्र नगरपरिषदेचे कर्मचारी या महामारीत आपली सेवा बजावत होते, अश्या देवदूत म्हणून काम करत असलेल्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यापासून पावसाचे संरक्षण साठी रेनकोट तर चिखल आणि घाणीपासून संरक्षण म्हणून गमबुट चे वाटप करण्यात आले.

कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या हस्ते रेनकोट व बुटाचे वाटप करण्यात आले, याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाणीपुरवठा सभापती राहुल डाळींबकर, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, सफाई कर्मचारी मुकादम प्रदीप मोरे आदी उपस्थित होते.








Be First to Comment