सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
इनरव्हील क्लब ऑफ कर्जतच्या अध्यक्षपदी करूणा पराडकर यांची निवड करण्यात आली.
कर्जत येथील राॅयल गार्डनच्या सभागृहात नवीन अध्यक्षा कमिटीचा पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभास क्लब जिल्हा सेक्रेटरी डाॅ. शोभना पालेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रारंभी दीपप्रज्वलन व स्वागत गीत सादर करण्यात आले.अध्यक्षा प्राची चौडीया यांनी वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून करूणा पराडकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षा उत्तरा वैद्य, खजिनदार पल्लवी सावंत, आय.एस. ओ. शिल्पा दगडे, एडिटर वनिता सोनी, सी. सी ज्योत्स्ना शिंदे या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षा उत्तरा वैद्य यांनी प्रमुख पाहुण्या यांची ओळख करून दिली. शोभना पालेकर यांनी क्लब वतीने आपण गरजू व्यक्तींना कशी मदत करता येईल, तसेच अनेक उपक्रम राबविण्या विषयी माहिती दिली. सेक्रेटरी मोनिका बड़ेकर, व नवनिर्वाचित अध्यक्षा करुणा पराडकर यांनी नवीन वर्षाचे संकल्प सभासदां समोर मांडले. याप्रसंगी सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








Be First to Comment