Press "Enter" to skip to content

माथेरान नगरपरिषदेवर पुन्हा एकदा भगवा फडकणार; शिवसैनिकांना विश्वास

शिवसेनेत पक्षप्रवेश करणाऱ्याची गर्दी

सिटी बेल | माथेरान | प्रतिनिधी |


शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे त्यास सर्वत्रच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. माथेरान या डोंगरमाथ्यावर सुध्दा शिवसेनेचे एकहाती वर्चस्व नगरपरिषदेत प्रस्थापित आहे. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकणार असा विश्वास गटनेते प्रसाद सावंत यांनी व्यक्त केला आहे.

शिवसंपर्क अभियान २४ जुलै पर्यंत राबविण्यात येणार असल्याने माथेरान मधील शिवसैनिकांनी प्रत्येक प्रभागात जाऊन युवा वर्गासह जेष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन आपल्याकडे आकर्षीत करण्यात यशस्वी होत आहेत.

संत रोहिदास नगर मधील विविध पक्षातील बहुतांश मंडळींनी स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व पत्करत आहेत. तर महिला आघाडीच्या रणरागिणी सुद्धा आपापल्या पद्धतीने कार्यरत असून गावातील महिलांना शिवसेनेत आणण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मागील महिन्यात संत रोहिदास नगर येथील चर्मकार समाजाचे मुख्य कार्यकर्ते सचिन काळे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता तर त्याचवेळी अशोक पवार, महेश पवार, नरेश पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले होते त्यांनी काही कारणास्तव पुन्हा एकदा शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

याबाबतीत त्यांना विचारले असता शिवसेनेच्या कामाची पद्धत आणि तळागाळातील लोकांशी नेहमीच जनसंपर्क असल्याने हा पक्ष नक्कीच गावाला विकासाच्या प्रवाहात नेण्यासाठी कटिबद्ध असल्याने शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारले असल्याचं सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाना आत्मचिंतनाची गरज दिसते असेही बोलले जात आहे.संत रोहिदास नगर मधील लोकांना आपल्या पक्षात आणण्यासाठी नगरसेवक नरेश काळे आणि युवा कार्यकर्ते श्रेयस गायकवाड यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

प्रसादभाई जनसंपर्क कार्यालयात सातत्याने पक्षप्रवेश करणाऱ्या लोकांची गर्दी दिसत असून अनेक लोक शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारण्यासाठी स्वेच्छेने पुढे येत आहेत. त्यामुळे आगामी काळात नगरपरिषदेवर पुन्हा एकदा शिवसेना आपले वर्चस्व प्रस्थापित करणार असा विश्वास समस्त शिवसैनिकांना वाटत आहे.

नुकताच पार पडलेल्या पक्षप्रवेश या छोटेखानी कार्यक्रमात शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, गटनेते प्रसाद सावंत, नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे, जेष्ठ शिवसैनिक अवधूत येरफुलें, योगेश जाधव, मित्र पक्षाचे ( आरपीआयचे) अध्यक्ष अनिल गायकवाड,सिताराम शिंदे, सूर्यकांत कारंडे,नितीन सावंत, मिथुन कदम, गणेश घावरे, समीर पन्हाळकर, सलीम महापुळे, बंटी शिंदे, महेश काळे, सुभाष काळे, राजा काळे,अक्षय सोनावणे, युवा सेनेचे निमेश मेहता,लक्ष्मण कदम,विजय सावंत,माजी नगरसेवक दिपक जाधव,यांसह अन्य कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.