सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
उरण विधानसभेचे आमदार माहेशजी बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून वावेघर भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी लोकहिताच्या विविध कामांचा योग्य पाठपुरावा करून वावेघर मधील जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्रात कोठेही एसटी चा प्रवास निम्म्या खर्चात व्हावा ह्याकरिता स्मार्ट कार्ड नोंदणी व वाटप ह्या सेवेचा लाभ व्हावा याकरीता शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराचा बहुसंख्य ज्येष्ठांनी लाभ घेतला तसेच वावेघर ग्रामपंचायत हद्दीत पंचायत समिती समाजकल्याण सेस फंडातून उपसरपंच संध्या महादेव कांबळे यांच्या प्रयत्नाने हायमास्ट दिवा लावण्यात आला. हायमास्टचा लोकार्पण सोहळा आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशमय करण्यात आले.

सदर कार्यक्रमास सरपंच विजय नामु चव्हाण, सावले सरपंच प्रशांत माळी, माजी सरपंच डॉ.अविनाश गाताडे,माजी सरपंच शिवाजी माळी, महादेव कांबळे (मुख्य संयोजक झोपडपट्टी सेल पनवेल भाजप ), अशोक गायकर (सदस्य ग्राम वावेघर,) विलास माळी(माजी उपसरपंच वावेघर), मनोज पवार (भाजपा पदाधिकारी), दामोदर माळी (बूथ अध्यक्ष वावेघर भाजपा), श्रीमती इंदूबाई खुडे(भाजपा कार्यकर्त्या), जेष्ठ नागरिक आमीन गौडा, फुलचंद सरवदे, रामू चव्हाण इत्यादीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.








Be First to Comment